Rahul Gandhi : "महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:27 PM2022-03-22T14:27:36+5:302022-03-22T14:41:16+5:30

Narendra Modi And Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ आणि महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

opposition protest against increase in fuel price rahul gandhi reaction | Rahul Gandhi : "महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला 

Rahul Gandhi : "महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला 

Next

नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. तसेच आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे.  पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इंधन दरवाढ आणि महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला आहे. सरकार सातत्याने किमतींचा विकास करेल अशा खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागलेला ‘लॉकडाऊन’ हटवला आहे. आता सरकार सातत्याने किमतींचा विकास करेल. महागाईविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं, तर ते म्हणतील ‘थाली बजाओ’!" असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत भलेही 137 दिवसांपासून वाढ झालेली नसेल, पण ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात अचानकपणे थेट 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दिल्लीत ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. या निर्णयापासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार, असा कयास लावला जात होता.
 

Web Title: opposition protest against increase in fuel price rahul gandhi reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.