नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी बातचीत केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं राऊत यांनी टिकेत यांना सांगितलं. दिल्लीऐवजी सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती- संजय राऊतकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनावरून सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. आज शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळानं गाझीपूरमध्ये जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेतली. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राकेश टिकैत यांची भेट; संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'विरोधक आम्हाला पाठिंबा देण्यास येत असल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण त्याचं राजकारण होऊ नये,' असं टिकैत म्हणाले. 'राजकीय नेते आमच्या भेटीसाठी येत असल्यास त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. या भागातील वाहतुकीची समस्या पोलिसांनी केलेल्या बॅराकेडिंगमुळे निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरलेली नाही,' असं टिकैत यांनी म्हटलं.राकेश टिकेत यांच्या भेटीनंतर काय म्हणाले संजय राऊत?शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गाझीपूर येथे भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये," असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:14 PM