चेन्नई : नव्या भारताबाबतचा आशावाद हा आपल्या अमेरिका दौºयातील बैठकांमधील एक समान धागा होता, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भारतीय समुदायाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असेही ते म्हणाले.आयआयटी मद्रासमध्ये ५६ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. मोदी म्हणाले की, एक अद्वितीय संधीच्या स्वरुपात जग भारताकडे पाहत आहे. मी अमेरिका दौºयावरून परतलो आहे. अनेक राज्यांचे प्रमुख, व्यापारी, गुंतवणूकदार यांच्याशी मी चर्चा केली. या चर्चेमध्ये एक समान धागा होता आणि तो म्हणजे नव्या भारताबाबत आशावाद. या देशातील तरुणांच्या क्षमतांबाबत विश्वास.मोदी म्हणाले की, भारतीय समुदायाने जगभरात विज्ञान, तंत्रज्ञानात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणांशी मी संवाद साधतो. यात आयआयटी पदवीधरांची संख्या आश्चर्यचकित करणारी आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक लोक आयआयटीमधील आहेत. या विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, आपण येथून बाहेर पडता तेव्हा अनेक संधी आपल्यासाठी खुल्या असतात. याचा उपयोग करा.
अमेरिका दौऱ्यात दिसला नव्या भारताबाबत आशावाद - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:33 AM