नवी दिल्ली : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॅगी नूडलच्या आणखी १६ नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. अनुचित व्यापारावरून नेस्ले इंडियाविरुद्ध सरकारने दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आयोगाने हा आदेश दिला आहे. अशा प्रकरणात ग्राहकांचे हित सर्वात महत्त्वपूर्ण आहे, असे आयोगाने म्हटले आहे.कायदेशीर निर्णय होत नाही, तोवर उत्पादनाच्या सुरक्षेबाबत संशय कायम राहील, असेही आयोगाने म्हटले आहे. आयोगाने १६ नमुन्यांचे परीक्षण करण्याबाबत आदेश दिल्याने आम्ही निराश झालो आहोत, असे नेस्ले इंडियाने म्हटले आहे. म्हैैसूर येथील प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहायला हवी होती, हा युक्तिवादहीआयोगाने फेटाळला.
मॅगीच्या १६ नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश
By admin | Published: December 11, 2015 1:59 AM