किटकनाशक कर्मचार्यांनी पूर्णवेळ काम करण्याचे आदेश
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
पुणे : महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांच्या कामाची वेळ सकाळी ७. ३० ते दुपारी ३. ३० अशी ८ तासांची करावी असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पूर्वी किटकनाशकच्या कर्मचार्यांना ६ तासांची डयुटी देण्यात आली होती, अत्यावश्यक सेवेमध्ये किटक प्रतिबंधक विभागाचा समावेश होत असल्याने त्यांच्या कामाची वेळ ८ तासांची करण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांच्या कामाची वेळ सकाळी ७. ३० ते दुपारी ३. ३० अशी ८ तासांची करावी असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पूर्वी किटकनाशकच्या कर्मचार्यांना ६ तासांची डयुटी देण्यात आली होती, अत्यावश्यक सेवेमध्ये किटक प्रतिबंधक विभागाचा समावेश होत असल्याने त्यांच्या कामाची वेळ ८ तासांची करण्यात आली आहे.शहरामध्ये डासअळीनाशक, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून किटकनाशक औषधांची फवारणी केली जाते. या कामाकरिता आरोग्य विभागाकडून ३५० कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहराच्या लोकसंख्येने ३५ लाखांचा टप्पा ओलांडला असताना शहराच्या आरोग्याचा भार याच कर्मचार्यांवर आहे. त्यांची कामाची वेळ पूर्वी सकाळी साडे सात ते दुपारी दीड अशी आहे. शहरामधील नदीकिनारे, खडड्े, बांधकामाचे डक्ट, नाले, गटारी याठिकाणी महापालिकेकडून नियमित किटकनाशक व औषध फवारणी केली जाते. मध्यंतरीच शहरात डेंग्यूचा मोठा फैलाव झाला होता. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा साथी अत्यंत वेगाने पसरतात. चुकून रोगाची उत्पत्ती झाल्यास त्याला अटकाव करणे खूप अवघड जाते. त्यामुळे औषध फवारणीची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने किटक नाशक विभागातील कर्मचार्यांच्या कामाची वेळ ६ तासावरून ८ तास करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या कर्मचार्यांना ६ तासांची डयुटी का देण्यात आली याची कोणतीही माहिती प्रशासनाच्या दफ्तरी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांच्या कामाची वेळ पूर्ववत ८ तास करण्यात यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.किटकनाशक विभागातील कर्मचार्यांना अंघोळ केल्याशिवाय जेवण करता येत नाही, त्यामुळे त्यांना अंघोळीसाठी दीड तासाची सवलत देण्यात आली होती. नवीन बदलामुळे त्यांना या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. हा निर्णय चुकीचा असून तो बदलण्यात यावा अशी मागणी महानगरपालिका कामगार संघटनेचे सरचिटणीस एस. के. पळशे यांनी केली आहे. चौकटसुरक्षितेची साधने द्यावीतकिटकनशाक विभागातील कर्मचार्यांना प्रशासनाने सेफ्टी शुज, कपडे, हॅन्डगोलज, गॉगल आदी सुरक्षितेची साधने पुरविणे आवश्यक असताना ती देण्यात आलेली नाहीत त्यामुळे जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागत आहे. यापुढे प्रशासनाने ही सेफ्टी साधने पुरविल्याशिवाय कोणतेही काम करणार नाही असे महानगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.