ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - कोळसा घोटाळ्यातील कथित सहभागाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) चे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
2 जी आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने रणजित सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्याचे सीबीआय संचालक आणि दोन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.