नवी दिल्ली : पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातील १६८ केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून, ते १२ मे रोजी होईल. त्रिपुराचे विशेष निवडणूक निरीक्षक व माजी निवडणूक उपायुक्त विनोद झुत्शी यांना ११ एप्रिल रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत दोष आढळले होते. त्यामुळे त्यांनी १३१ केंद्रांवर फेरमतदान घेण्याची शिफारस केली. निवडणूक आयोगाला मात्र अशा केद्रांची संख्या अधिक दिसून आली आहे.यापूर्वी त्रिपुरा कॉँग्रेसने निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच किमान ८५० केंद्रांवर फेरमतदान न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. पश्चिम त्रिपुरा मतदारसंघात १६७९ मतदान केंद्रे आहेत.
पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातील १६८ केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:20 IST