नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव आणि अन्य १३ जणांविरुद्ध फौजदारी कट, फसवणूक आणि अन्य गुन्ह्यांत आरोप निश्चित करण्याचा आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.जिंदल व राव यांच्याशिवाय ज्या अन्य लोकांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा, माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि अन्य ११ जणांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध सीबीआयने याआधीच आरोपपत्र दाखल केले आहे. २००८ मध्ये जिंदल स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड आणि गगन स्पाँज आयर्न प्रा.लि. या कंपन्यांनी केलेल्या अमरकोंडा मुर्गादंगल कोळसा खाणपट्टा वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे.रुंगटांची न्यायालयात धावन्यायालयाने कोळसा प्रकरणी आर. एस. रुंगटा, आर.सी. रुंगटा यांना दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रुंगटा यांनी दोषसिद्धी व कारावासाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरून न्यायालयाने सीबीआयला नोटीस जारी करून ६ मेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१५ जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश
By admin | Published: April 30, 2016 3:56 AM