काँग्रेसमध्ये कार्यकारिणीसह होणार संघटनात्मक फेरबदल?; सोनिया गांधी यांचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:50 AM2021-07-14T09:50:14+5:302021-07-14T09:55:02+5:30

फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.

Organizational reshuffle with the executive in Congress?; Thoughts of Congress President Sonia Gandhi | काँग्रेसमध्ये कार्यकारिणीसह होणार संघटनात्मक फेरबदल?; सोनिया गांधी यांचा विचार

काँग्रेसमध्ये कार्यकारिणीसह होणार संघटनात्मक फेरबदल?; सोनिया गांधी यांचा विचार

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : पुढील दोन वर्षात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आव्हानांला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा काँग्रेस कार्यकारिणीसह संघटनात्मक फेरबदल करण्याचा बेत आहे. हे फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.

लोकसभेच्या दोनशे जागांसाठी काँग्रेस आणि भाजपदरम्यान थेट लढत होणार असेल, तर पंजाब, राजस्थान, छत्तीसगढमधील सत्ता राखणे आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळविणे, हेच काँग्रेसचे प्राधान्य आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार झारखंड, तेलंगणात निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर रणनितीक आघाडीने भाजपला रोखता येईल. २३ नेत्यांच्या समूहाचाही (जी २३) समावेश केला जाऊ शकतो. या भूपिंदर सिंह हुडा वगळता या समूहातील अन्य जनमाणसात प्रभाव असलेले नेते नसले, तरी ते अनुभवी आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी निष्ठावंत आहेत. 

प्रियांका गांधींकडे मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेशच्या प्रभारी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. या व्यतिरिक्त देशातील विविध प्रदेशांत संघटनात्मक जबाबदारी सांभाळण्यासाठी उपाध्यक्ष नियुक्त करण्याचीही चर्चा आहे. तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या १२ सदस्यांची निवड निवडणुकीतून होते. काँग्रेस अध्यक्ष १२ सदस्य नियुक्त करतात; परंतु, १२ सदस्यांची निवडणूक पक्ष टाळत आले आहे. काँग्रेस संसदीय मंडळामुळे ( आता अस्तित्वात नाही. कारण त्याची जागा केंद्रीय निवडणूक समितीने घेतली आहे) संघटनात कटुता निर्माण होते, असा अनुभव असला तरी लोकप्रिय नेते ओळखण्याचा हाच एक मार्ग असू शकतो.

Web Title: Organizational reshuffle with the executive in Congress?; Thoughts of Congress President Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.