शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

स्टेशनवर आयोजित करा विवाह सोहळा आणि अन्य समारंभ

By admin | Published: December 29, 2016 12:51 AM

रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड

नवी दिल्ली : रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, उभे राहायलाही नसलेली जागा आणि उपनगरी गाडी येताच त्यातून उतरण्यासाठी आणि आत शिरण्यासाठी उडणारी झुंबड. अशा रेल्वे स्टेशनवर कुणाच्या विवाह समारंभ आयोजित करावा, असा विचार आतापर्यंत कोणाच्या मनातही डोकावला नसेल. पण यापुढे रेल्वे स्टेशनवरही विवाह सोहळे आणि बँड, बाजा, बारात हे चित्र पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्लॅटफॉर्मवर यज्ञासमोर बसून भटजी मंत्र पुटपुटत आहेत, आंतरपाट धरून काही जण उभे आहेत, दोन्ही बाजुंना वधू-वर हातात हार धरून उभे आहेत, सात प्रदक्षिणा घेत आहेत, सात जन्म एकत्र राहण्याचे वचन एकमेकांना देत आहेत, मंगलाष्टके सुरू असताना हातात अक्षता असलेल्यांची गर्दी आणि एकमेकांना हार घालताच सुरू होणारा सनई-चौघडा आणि त्यानंतर लगेचच जेवणाच्या पहिल्याच पंगतीत बसण्यासाठी काहींची धावपळ असे चित्र रेल्वे प्लॅटर्फार्मवर पाहायला मिळू शकेल. किंबहुना विवाह सोहळ्यांसाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने सुरूही केली आहे. याच्याच तयारीला सध्या रेल्वे मंत्रालय लागले आहे. त्यामुळे आता लवकरच किमान या २00 रेल्वे स्टेशनवर मंगलाष्टके आणि सनई चौघडे ऐकू येण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) - नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे विकास शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच काही सल्लेही दिले होते. त्यातूनच रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य सोहळ्यांसाठी देण्याचा विचार करावा, अशी कल्पना समोर आली. २00 स्टेशन मोकळीच!- रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात जवळपास आठ हजार रेल्वे स्टेशन्स आहेत. यापैकी किमान २00 स्टेशनवर दिवसातून एक वा दोन गाड्याच येतात वा तिथे थांबतात. या स्टेशनवर प्लॅटफॉर्मशिवाय बरीच जागा उपलब्ध असून, तिचा क्वचितच वापर केला जातो. या स्टेशनकडून रेल्वेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे ही रेल्वो स्टेशन नफ्यात आणण्यासाठी त्यांचे प्लॅटफॉर्म लग्नकार्य आणि अन्य सोहळ्यांसाठी देण्याच्या कल्पनेवर रेल्वे विचार करत आहे. यातील काही रेल्वे स्टेशन ग्रामीण भागात आहेत. तिथे सहजच या स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य कार्यक्रमांसाठी करता येईल, असे केल्यामुळे रेल्वेचे उत्पन्न होईल आणि दुसरीकडे लोकांना चांगली सुविधाही मिळू शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे.