नवी दिल्ली : स्टार्ट अप सुरू करणाऱ्यांना व्यापार उद्योग व व्यवसायातील कौशल्य अवघ्या २ दिवसात शिकता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेंट) मंत्रालयाच्या विद्यमाने सरकारच्याच एका एजन्सीव्दारे क्रॅश कोर्सचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले आहे.या अभ्यासक्रमात व्यापार उद्योग व्यवसायाच्या स्टार्ट अपसाठी निधीची उभारणी, व्यवस्थापन, उत्पादनांचे पणन (मार्केटिंग), बिझिनेस प्रमोशन, जीएसटीसह व्यापार विषयक आवश्यक कायद्यांचे ज्ञानही सहभागी होणाºयांना करून दिले जाणार आहे. यासाठी नॅशनल इन्स्टिटयुट आॅफ आंतरप्रिन्युअरशिप अँड स्मॉल बिझिनेस डेव्हलपमेंटची नियुक्ती करण्यात आली आहे. स्टार्टअप कसा सुरू करता येईल, याच्या पूर्वतयारीसाठी काही खास अल्पकालिन अभ्यासक्रम निसबड व्दारा योजले आहेत.
कौशल्य विकास मंत्रालयातर्फे २ दिवसांच्या क्रॅश कोर्सचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 3:54 AM