जोरण : बागलाण तालुक्यातील आर्दश किकवारी येथील ग्रामदैवत कालभैरव जयंतीनिमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची विविध कार्यक्र मांनी सांगता झाली. प्रतिवर्षाप्रमाणे वै. कृष्णामाउली जायखेडेकर यांच्या आशीर्वादाने यशोदाआक्का व श्री क्षेत्र कपालेश्वरचे मठाधीपती पोपट नाना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि . २७ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास दररोज पहाटे ५ वाजता काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी २ ते ४ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व रात्री भजनांचा कार्यक्र म होत होता. गुरुवारी (दि. ३) कालभैरव जयंतीस सप्ताहाची सांगता झाली. त्यानिमित्त सकाळी ९ ते ११ ध्वज मिरवणूक, दुपारी ११ ते १२ होमपूजन , सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ८.३० महाप्रसाद व रात्री ९ वाजता ज्ञानेश्वर महाराज शिंदे (आळंदीकर) यांचे कीर्तन झाले. तसेच गुरु वारी ११ वाजता कुस्त्यांची दंगलही झाली. कालभैरवाचे उपासक शंकर शिवमन काकुळते यांचे निधन झाले. यांच्या मार्गदर्शनाखालीच अनेक वर्षांपासून कालभैरव जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जात असे. या वर्षी त्यांच्या मुलांनी हा वारसा कायम ठेवला आहे. कौतिक शंकर काकुळते, वारकरी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
आर्दश किकवारी खु।। येथे कालभैरव जयंतीनिमित्त पारायणाची सांगता
By admin | Published: December 05, 2015 12:42 AM