ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन अर्थात OROP योजना लागू होणार असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. OROP संर्दभातील सर्व मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे सरकारच्या विरोधात आज सर्व माजी सैनिकांनी मेडल वापसी करणार असल्याचे जाहीर केले होते. जर वन रँक वन पेन्शंन योजना सरकारने लागू नाही केली तर दिवाळी साजरी करणार नाही असेही माजी सैनिकांने सांगीतले होते.
निवृत्त सैनिकांसाठी असलेली निवृत्तीवेतन योजना (OROP) १ जुलै २०१४ पासून लागू केली होती पण सरकार आणि अंदोलनकर्ते (माजी सैनिक) यांच्यातील तिढा कायम होता. एकाच हुद्यावर मात्र वेगवेगळ्या काळात निवृत्त होणा-या सैनिकांना एकच निवृत्ती वेतन दिलं जाव अशी मागणी लष्करी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी केली होती. त्यासाठी जंतरमंतरवर ८२ दिवस उपोषन केले होते.
जवळपास ८० टक्के सैनिक मुदतपूर्व निवृत्ती घेतात त्यामुळे ते जर या योजनेत येणार नसतील तर या योजनेला काही अर्थच राहत नाही असे सांगत या मुद्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी सतबिर सिंग व अन्य माजी सैनिकांनी केली होती. याशिवाय, एकसदस्यीय न्यायिक समितीऐवजी पाचजणांची समिती असावी अशी सैनिकांची मागणी होती. निवृत्तीवेतनाची फेररचना दरवर्षी व्हावी अशी मागणी होती, मात्र केंद्राने ही मुदत पाच वर्षांची ठरवली आहे. यासह एकूण पाच मागण्या सरकारने फेटाळल्याने माजी सैनिक पूर्णपणे समाधानी नव्हते.