जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणी निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. चौकशीपूूर्वी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घेतला नाही तर न्यायालयात याचिका दाखल करून सादरे कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार, अशी भूमिका आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी शुक्रवारी सायंकाळी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. शर्मा मेनन म्हणाल्या, सादरे यांच्या कुटुंबीयांची नाशिक येथे भेट घेतली. त्यात सादरे यांच्या कुटुंबीयांनी चौकशीबाबत असमाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणी अजूनही सादरे यांच्या आत्महत्याप्रकरणातील आरोपी मोकाट आहे. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व निरीक्षक प्रभाकर रायते हे निलंबित झालेले नाहीत. सागर चौधरीला अटक झालेली नाही. महसूलमंत्री खडसे यांनी आपली वाळू माफिया सागर चौधरीशी ओळख नाही, असा दावा केला होता. परंतु खडसे व चौधरी हे खडसे यांच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये उपस्थित असल्याची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामुळे खडसे या प्रकरणी खोटे बोलत आहेत. त्यांचा राजीनामा तातडीने घ्यायला हवा असे त्या म्हणाल्या. खान्देशाबाहेर कार्यरत आयपीएस अधिकार्यांची नियुक्ती करामहसूल व पोलीस प्रशासन महसूल मत्र्यांच्या दबावात काम करते. त्यामुळे सादरे यांची आत्महत्या व जिल्ातील वाळूसंबंधीच्या प्रकरणांची चौकशी निष्पक्षपणे होण्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. खडसे यांनी सादरे आत्महत्येप्रकरणी राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु ते राजीनामा देत नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून कारवाई करावी आणि सादरे आत्महत्येच्या चौकशीसाठी खान्देशाबाहेर कार्यरत आयपीएस अधिकार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही शर्मा मेनन यांनी केली.
अन्यथा आम आदमी पार्टी न्यायालयात जाणार प्रीती शर्मा मेनन : एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घ्या
By admin | Published: October 24, 2015 1:38 AM