अरविंद राठोड
मुंबई, दि. १३ : होय...हे खरयं... फेसबुक अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत आपण आपले सर्व फोटो अल्बममध्ये साठवत होतो....मात्र, आता हे अल्बम डिलीट करण्याचे ठरवलयं फेसबुकने...तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्याचं नव अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करीत नाहीत.सोशल मीडियावरील संकेतस्थळ फेसबुक नेहमीच नवीन वैशिष्ट्ये आपल्या मुख्य अॅपमध्ये सुरू करते आणि नंतर त्यासाठी एक नवीन अॅप काढून, ते वैशिष्ट्य मुख्य अॅपमधून काढून टाकते. अशातच नाविलाजास्तव हे नवीन अॅप वापरावे लागते. याचे सर्वात मोठे उदाहरण फेसबुक मैसेंजर आहे.
फेसबुकने सर्व वापरकर्त्यांना ई-मेल पाठवून, त्यात ७ जुलैपर्यंत त्यांचे ‘मोमेंटस्’ (टङ्मेील्ल३२) हे अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले आहे. असे न केल्यास फेसबुक तुमचे सर्व व्यक्तिगत फोटो डिलीट करण्यास सुरूवात करणार आहे.नवीन अॅपच्या प्रमोशनसाठी फंडा - वरील वैशिष्ट्य संपविण्यामागे फेसबुकने स्वत:चे हीत साधले आहे. कारण कंपनीद्वारा लोकांसाठी त्यांचे अॅप वापरण्यावर भर दिला जाणार आहे.या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने ‘मोमेंटस्' हे अॅप सुरू केले होते. मात्र, याकडे वापरकर्त्यांनी लक्ष दिलेच नाही. आता मात्र हे अॅप वापरावे लागणार आहे. या माध्यमातून साठवलेले फोटो मित्र, नातेवाईकांसोबत शेअर करण्याची सोय दिलेली आहे.सर्वात आधी हे करा - ज्यांना टङ्मेील्ल३२ हे अॅप डाऊनलोड करावयाचे नाही त्यांना फेसबुकने एक सोय करून दिली आहे. ७ जुलैपूर्वी फेसबुक प्रोफाईलवरून सर्व अल्बमधील फोटो एकत्रितरित्या (झिप फाईल) स्वत:च्या कॉम्प्युटरवर डाऊनलोड करता येऊ शकणार आहेत. त्यामुळे आता पटापट कामाला लागा...नाहीतर फेसबुक तुमचे फोटो अल्बम डिलीट करण्यास सुरूवात करेल !