Rahul Gandhi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या बँक खात्यांवर कारवाई झाली असून काँग्रेसची खाती गोठवली आहेत. याबाबत आज काँग्रेसने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. " या निवडणुकीत आम्ही प्रचारही करु शकत नाही, आमचे नेते प्रवासही करु शकत नाहीत. रेल्वे तिकीटासाठीही पैसे नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत
आज दिल्लीत झालेल्या पत्रकाप परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अजय माकन उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, विना बँक खाते आम्ही निवडणूक कशी लढणार, जर तुमच बँक खाते बंद केले, एटीएम बंद केले तर तुम्ही जगणारा कसे? आम्ही ना प्रचार करु शकतं, ना प्रवास करु शकतं, ना नेत्यांना पैसा देऊ शकत, असंही राहुल गांधी म्हणाले.
"निवडणुच्या दोन महिने आधी काँग्रेसच्या बँक खात्यावर कारवाई करणे म्हणजे काँग्रेसला निवडणूक लढवूच द्यायची नाही, एक महिन्यापूर्वी काँग्रेसची सर्व खाती फ्रीज केली आहेत. काँग्रेससोबतच अन्याय सुरू आहे. निवडणूक आयोग यावर शांत आहे. आम्हाला २० टक्के मतदान करतात, सर्व संस्थात्मक संघटना शांत आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.
'देशात लोकशाही आहे हे खोटं आहे, आमची बँक खाती गोठवली नाही तर लोकशाही गोठवली आहे. सात वर्ष आधी १४ लाखांचा मुद्दा आहे, १० हजार रुपयांचा दंड असायला हवा होता आज ते २०० कोटी वसूल करत आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.