चेन्नई : न्यायालयीन निकालाच्या बातमीत वकिलांची नावे देऊ नयेत, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने प्रसिद्धीमाध्यमांना केली. वकिलांची नावे प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक क्षमतांची अप्रत्यक्ष जाहिरात होते, असे वाटते, त्यामुळे त्यांची नावे छापणे टाळावे, तसेच फारच गरज असेल तरच न्यायाधीशांची नावे प्रसिद्ध करावीत, अन्यथा तेही टाळावे, अशी विनंती प्रसिद्धीमाध्यमांना करण्याची सूचना खंडपीठाने निबंधकांना केली. उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायमूर्ती माननीय मुख्य न्यायाधीशांनी नेमून दिल्याबरहुकूम काम करतो. त्यामुळे त्यांची नावेही प्रसिद्ध करण्याची गरज नाही, असेही न्यायमूर्ती एन. राममोहन राव आणि एस. एस. सुंदर यांच्या खंडपीठाने म्हटले. न्यायमूर्ती नि:पक्षपातीपणे त्यांचे कर्तव्य बजावतात आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रकरणाचा निकाल देताना स्वत:चे मत किंवा विचारसरणीचा निकालावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतात. त्यामुळे न्यायमूर्तींची नावे प्रसिद्ध केली जाऊ नयेत. केवळ उच्च न्यायालयाचे नाव तेवढे प्रसिद्ध केले जावे, असेही या खंडपीठाने म्हटले. पुतिया तमिळगम पार्टीशी संबंधित अॅड. एस. भास्कर मथुराम यांची जनहित याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने वरील निकाल दिला. (वृत्तसंस्था)>याचिकाकर्त्यावर कारवाईअॅड. एस. भास्कर यांनी प्रसिद्धीसाठी याचिका केल्याचे नमूद करून खंडपीठाने बार कौन्सिलशी संपर्क साधून, आचारसंहिता आणि व्यावसायिक आचरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भास्कर यांच्याविरुद्ध सहा महिन्यांत कारवाई केली जावी, असेही निबंधकांना सांगितले.
न्यायालयीन बातमीत आमची नावे नकोत!
By admin | Published: August 26, 2016 3:58 AM