शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 1:26 PM

ventilators : डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे व्हेंटिलेटर्स एक किंवा दोन तासांच्या वापरानंतर आपोआप बंद होतात.

ठळक मुद्देप्राधान्याने तत्काळ रुग्णालयात दहा नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

चंदीगड :  पीएम केअर्स फंडद्वारे (PM Cares Fund) पंजाबला पाठविलेल्या व्हेंटिलेटर्सवरून (Ventilators) केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. केंद्र सरकारने पंजाबला दिलेल्या ८०९ व्हेंटिलेटर्सच्या वापरण्याबाबत विचारणा करणारे एक पत्र लिहिले होते. त्यावर आता फरीदकोटमधील गुरु गोविंदसिंग मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे (Guru Gobind Singh Medical College and Hospital)व्यवस्थापक म्हणाले की, पीएम केअर्स फंडद्वारे पाठविण्यात आलेले ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ व्हेंटिलेटर्स खराब आहेत. दरम्यान, हे व्हेंटिलेटर पीएम केअर्स फंड अंतर्गत एजीव्हीए हेल्थकेअरने (AgVa Healthcare) गुरु गोविंदसिंग मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला दिले होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे व्हेंटिलेटर्स एक किंवा दोन तासांच्या वापरानंतर आपोआप बंद होतात.

सध्या रुग्णालयातील ४२ व्हेंटिलेटर्स योग्य स्थितीत आहेत. पीएम केअर्स फंडद्वारे आलेले ६२ व्हेंटिलेटर खराब आहेत. याबद्दल कंपनीशी चर्चा झाली आहे. कंपनीने लवकरच तांत्रिक कर्मचारी पाठवून व्हेंटिलेटर्स ठिक करण्याचे आश्वासन दिले आहे, असे बाबा फरीद विद्यापीठाचे (Baba Farid University)कुलगुरू डॉ. राजा बहादुर यांनी सांगितले. तसेच, पंजाब सरकारने १० नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे, असेही डॉ. राजा बहादुर म्हणाले.

(Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...)

एका रिपोर्टनुसार, पंजाबमध्ये पीएम केअर्स फंडमधून पाठविण्यात येणाऱ्या ८०९ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पंजाब सरकारवर व्हेंटिलेटर बसविण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्य सचिव विनी महाजन (Chief Secretary Vini Mahajan) यांनी खराब व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्यासाठी अभियंते व तंत्रज्ञ नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे. याचबरोबर, प्राधान्याने तत्काळ रुग्णालयात दहा नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

("कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी)

दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या दाव्यावर मोदी सरकारकडून खुलासापंजाबमधील फरीदकोट येथे केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडमधून मदत म्हणून पाठवलेले व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्र सरकारने पीएम केअर्सअंतर्गत पुरवलेले काही व्हेंटिलेटर्स फरीदकोटमधील जीजीएस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पडून असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या व्हेंटिलेटर्समध्ये तांत्रिक अडचणी असून निर्मात्या कंपनीने वस्तू खरेदी करण्यात आल्यानंतर देण्यात येणारी सेवा नीट दिली नसल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे. मात्र या बातम्यांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (बीईएल) ८८ व्हेंटिलेटर्स पुरवले आहेत. तसेच पाच व्हेंटिलेटर्स एजीव्हीएने पुरवले आहेत. या व्हेटिलेटर्सचे इन्टॉलेशन आणि कमिशनिंग झाल्यानंतर हे व्हेंलिटेर्स आम्ही स्वीकारत आहोत असे पत्र रुग्णालय प्रशासनाने दिले होते, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPunjabपंजाब