शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दिल्लीसह १५ राज्यांत आंदोलनाचा उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 6:33 AM

गोळीबार, हिंसाचारात तिघांचा मृत्यू : नव्या नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी व राजकीय कार्यकर्तेही रस्त्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या आंदोलनाने गुरुवारी विराट रूप धारण केल्याने दिल्लीतील जनजीवन पूर्णपणे थांबले. हे आंदोलन पसरू नये, म्हणून सरकारने दिल्लीतील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केल्या. तसेच २0 मेट्रो स्टेशन्स बंद केली. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, बिहार, आसाम, मेघालय, पंजाब, गोवा आदी १५ राज्यांतही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थीव राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही उतरले होते.दिल्लीमध्ये माकप नेते सीताराम येचुरी, वृंदा करात, सीपीआयचे डी. राजा, काँग्रेस नेते अजय माकन, संदीप दीक्षित, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांच्यासह पोलिसांनी जवळपास ६०० लोकांना ताब्यात घेतले, तर कर्नाटकात प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांनाही पोलिसांनी अटक केली. कर्नाटकच्या अनेक शहरांतील विद्यार्थी आंदोलनात उतरले होते.उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली. तिथे एसटी बसेससह काही खासगी वाहने पेटवण्यात आली.त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. बिहारमध्ये अनेकरेल्वेगाड्या अडवण्यात आल्या. तसेच गुजरात, बिहार, कर्नाटक आदी राज्यांमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनीबळाचा वापर केला. जवळपास या सर्व राज्यांमध्ये पोलिसांनी आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊ न जमावबंदी लागू केली होती. पण ती झुगारून हजारो लोक या कायद्याच्या विरोधात रस्त्यांवर उतरले होते.हे आंदोलन पसरू नये, म्हणून सरकारने दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करतानाच, अनेक रस्तेही बंद केले. त्यामुळे लोकांना कुठेही जाणे अशक्य झाले. अनेक वैमानिक पोहोचू न शकल्याने काही विमाने रद्द करावी लागली. तसेच मेट्रो रेल्वे स्टेशन व शहरातील बससेवा बंद केल्याने लोकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला.२० गाड्यांतून आंदोलकांना नेलेदिल्लीच्या मंडी हाउसपासून शहीद पार्कमध्ये माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्र्चा निघाला. या परिसरातही पोलिसांनी जमावबंदी लागू करून, येचुरी, डी. राजा, वृंदा करात, निलोत्पल बसू यांनाही ताब्यात घेतले.जमावबंदीचा आदेश झुगारून अनेक विद्यार्थी जंतरमंतरवर जमा झाले होते.विद्यार्थ्यांनी तोंडाला पट्ट्या लावून ‘सेव्ह कान्स्टिट्युशन’ असा मजकूर लिहिलेले फलकहाती घेतले होते.हजारो विद्यार्थी सकाळपासून लाल किल्ला परिसरात जमा झाले होते. परंतु पोलिसांनी तिथे लगेचच जमावबंदी लागू केली आणि विद्यार्थी नेता उमर खालिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्वच विद्यार्थ्यांना पकडण्याचे सत्र सुरू केले. तेथून सुमारे २० गाड्या भरून विद्यार्थ्यांना नेण्यात आले. सर्वांना संध्याकाळी सोडण्यात आले.पोलिसांच्या कारवाईचा निषेधच्गेल्या रविवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रतिक्रिया आज पाहायला मिळाली.च्सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर हिंसा थांबल्यानंतर दिल्लीतील जनजीवन सुरळीत होईल, असे वाटत असताना लाल किल्ला परिसरातून निघालेल्या शांतता मार्चवर पोलिसांनी निर्बंध घातले. जामिया, जेएनयू व दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांनी लाल किला परिसरात शांततेने आंदोलनाचे आवाहन केले होते.तीन जणांचा मृत्यू : मंगळुरूमध्ये दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. दगडफेकीत २0 पोलीस जखमी झाले. लखनऊमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात एक जण मरण पावला.