देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 06:00 AM2021-01-11T06:00:30+5:302021-01-11T06:00:47+5:30

उत्तर प्रदेश, केरळ आदींचा समावेश

Outbreak of bird flu in seven states of the country | देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव

देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाला आहे. ही साथ महाराष्ट्रासह आणखी राज्यांत पसरू नये, यासाठी अतिशय दक्षता घेण्यात येत 
आहे.

आणखी कोणत्या राज्यांत बर्ड फ्लूची साथ पसरण्याचा धोका आहे, याचा अंदाज घेऊन केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने विविध ठिकाणी पाहणी सुरू केली आहे. दिल्लीमध्ये कोंबड्या किंवा अन्य पाळीव पक्षी आणण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. देशभर कोरोनाच्या साथीने थैमान घातलेले असतानाच आता त्यात बर्ड फ्लूची भर पडल्याने केंद्र तसेच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कुठेही पक्षी मरण पावल्याची घटना नजरेस आली तर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील पशुसंवर्धन खात्यांकडून त्याची तातडीने दखल घेतली जात आहे. घटनास्थळी जाऊन सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत.   

कानपूर प्राणी संग्रहालय काही दिवसांसाठी बंद
n उत्तर प्रदेशमधील संग्रामपूर येथेही सहा कावळे मरण पावल्याचे निदर्शनास आले. कानपूरचे प्राणी संग्रहालयही काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. 
n मध्य प्रदेशमधील १३ जिल्ह्यांमध्ये फैलाव झाला आहे. पंजाबमध्ये अन्य राज्यांतून कोंबड्यांची आयात करण्यास १५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Outbreak of bird flu in seven states of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.