नवी दिल्ली: मंगळवार आणि बुधवारी राज्यसभेत (Rajya Sabha) झालेल्य़ा गोंधळ, धक्काबुक्कीवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नायडू यांनी गुरुवारी मार्शलांची नियुक्तीवर अहवाल मागविला होता. यानंतर सायंकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. तसेच मार्शलांकडूनही उत्तर मागविण्यात आले होते. (Venkaiah Naidu hints action on Rajyasabha members who involeved in rajya sabha uproar.)
Rajya Sabha: राज्यसभेत नेमके काय घडले; आरोपांच्या फैरीनंतर मार्शल आले समोर, लेखी दिले
राज्यसभेत घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व बाबींवर विचार करण्यात आला आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. माझ्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही माझ्या डोळ्यांसारखे आहेत. माझ्या नजरेत दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही डोळे असतील तरच योग्य पद्धतीने पाहता येईल, असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.सभागृहाचे कामकाज योग्य रितीने चालावे ही दोन्ही बाजुंची जबाबदारी आहे. येथे बाहेरील राजकीय लढाया लढू नयेत, असे म्हटले.
दुसरीकडे सुत्रांनी एएनआयला सांगितले की, हे प्रकरण आता विशेषाधिकार समितीकडे पाठविले जाईल किंवा नवीन समिती बनविली जाईल. नायडू यांनी सांगितले की, यावर विस्तृत चर्चा केली जात आहे. यावर योग्य कारवाई केली जाईल. अशाप्रकारचे कोणतेही मतभेद झाले तर सभागृह मिळून निर्णय घेते. मला सत्ताधारी, विरोधक दोन्ही तेवढेच प्रिय आहेत, असे संकेत नायडू यांनी दिले.
विरोधकांचे आरोप काय?काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आरोप केला होता की, राज्यसभेत जेवढे सदस्य नव्हते त्यापेक्षा जास्त संख्येने मार्शल हजर होते. पुरुष मार्शलांन महिला खासदारांनाही धक्काबुक्की केली. हे मार्शल संसदेतील नव्हते तर बाहेरील होते. यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधकांनी भेट घेतली होती. 10 ऑगस्टपासूनच राज्यसभेत अधिक संख्येने सुरक्ष रक्षक तैनात केले होते, जे सामान्य कामकाजाच्या दिवशी कधीही तिथे नव्हते.
Rajya Sabha: राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नव्हते, बाहेरचे लोक? व्यंकय्या नायडूंना मिळाला रिपोर्ट
अधिकारी काय म्हणाले...यावर नायडू यांनी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. संसदेच्या स्टाफने यावर खुलासा पाठविला आहे. 10 ऑगस्टला कोणत्याही बाहेरील व्यक्तीला मार्शल म्हणून तैनात करण्यात आले नव्हते. लोकसभेत आणि राज्यसभेत फक्त लक्ष ठेवण्यासाठी आणि वॉर्ड स्टाफ असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्शल म्हणून तैनात केले होते. मार्शल किती असावेत किंवा ठेवावेत याची संख्या गरजेनुसार ठरविली जाते. हे मार्शल 14 ते 42 एवढ्या संख्येने असू शकतात. सर्वकाही कामकाजावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे अहवालात म्हटले आहे.