शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

BSF, CRPF आणि CISF यांसारख्या दलांमध्ये 1.14 लाख पदे रिक्त;  सरकारची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 6:09 PM

2023 मध्ये जवळपास 31,879 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी 1,126 पदे भरण्यात आली आहेत, असेही केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले.

नवी दिल्ली : सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांसारख्या केंद्रीय पोलीस दलांमध्ये 1,14,245 पदे रिक्त आहेत, असे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. तसेच, 2023 मध्ये जवळपास 31,879 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी 1,126 पदे भरण्यात आली आहेत, असेही केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले.

गृह मंत्रालय आणि त्याच्या संघटना, ज्यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जसे की सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि केंद्रीय पोलीस दलाचा यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लेखी उत्तरात सांगितले की, दिल्ली पोलिसांसह, सध्या जवळपास 1,14,245 पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांपैकी 3,075 ग्रुप 'ए', 15,861  ग्रुप 'बी' आणि 95,309 ग्रुप 'सी' मध्ये आहेत. त्यापैकी 16,356 पदे अनुसूचित जातीसाठी, 8,759 अनुसूचित जमातीसाठी, 21,974 इतर मागासवर्गीयांसाठी, 7,394 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि 59,762 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले की, रिक्त पदांची भरती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि जेव्हा आणि जेव्हा रिक्त पदे असतात. तेव्हा पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती पत्र दिले जाते. रिक्त पदे भरली जावीत यासाठी मंत्रालय नियमितपणे भरतीच्या प्रगतीचा आढावा घेते. ही पदे कालबद्ध पद्धतीने भरली जातात.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBSFसीमा सुरक्षा दल