शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
2
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
3
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
4
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
5
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
6
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
8
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
9
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
10
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
11
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
12
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
13
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
14
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."
15
"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान
16
IND vs AUS : 'त्या' प्रश्नावर KL राहुल म्हणाला; मला सांगितलंय की, कुणाला काही सांगू नकोस!
17
मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ
18
मॉर्निंग वॉकसाठी नेमकी कोणती वेळ आहे सर्वोत्तम?; 'या' गोष्टींचा विचार केल्यास जास्त फायदा
19
राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा
20
राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

लैशराम कमलबाबू सिंह यांच्या शोधात लष्कराचे 2000 जवान; जाणून घ्या, त्यांच्याविषयी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 4:23 PM

Laishram Kamalbabu Singh in Manipur : दोन हजारांहून अधिक लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.

Laishram Kamalbabu Singh in Manipur : मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी हिंसाचार उसळला होता. यानंतर याठिकाणी अद्याप म्हणावी तशी शांततेची परिस्थिती दिसून येत नाही. दरम्यान, येथील लैशराम कमलबाबू सिंह यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कर युद्धपातळीवर कार्यरत आहे. एक आठवड्याहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या मैतेई समुदायातील या व्यक्तीचा शोध लष्कराचे जवान घेत आहेत. यासाठी दोन हजारांहून अधिक लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लैशराम कमलबाबू सिंह हे मूळचे आसाममधील कछार जिल्ह्यातील असून ते इंफाळ पश्चिमेतील खुकरुल येथे राहत होते. 57 व्या माउंटन डिव्हिजनसाठी लेईमाखोंग मिलिटरी बेस येथे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस (एमईएस) सह काम करणाऱ्या कंत्राटदारासाठी ते कार्य पर्यवेक्षक होते. लैशराम कमलबाबू सिंह हे लष्करी तळावरून बेपत्ता झाल्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

मणिपूर पोलीस भारतीय लष्कराच्या मदतीने 25 नोव्हेंबर 2024 पासून लैशराम कमलबाबू सिंह याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत आहेत, असे मणिपूर पोलिसांनी सोमवारी रात्री फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, पोस्टनुसार, लष्कराने 2000 हून अधिक जवान, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि आर्मी स्निफर डॉगच्या मदतीने त्यांना शोधण्यासाठी सर्व मदत आणि संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच, तांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर करून पुढील तपास केला जात आहे.

पत्नीसह लोकांनी सुरु केलंय आंदोलनदरम्यान, लैशराम कमलबाबू सिंह हे बेपत्ता झाल्यामुळे लष्कराच्या तळापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या कांटो सबलमध्ये आंदोलन सुरू आहे. याठिकाणी रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. लैशराम कमलबाबू सिंह यांच्या पत्नी अकोईजम बेलारानी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान