जिनिव्हा : जगभरच उशिरापर्यंत काम करण्याच्या सवयीमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले.
उशिरापर्यंत काम करणाऱ्यांचा एक अभ्यास केला गेला. त्यात वर्ष २०१६ मध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या सात लाख ४५ हजार लोकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. ही संख्या वर्ष २००० मधील मृत्यूसंख्येशी तुलना केल्यास ३० टक्के जास्त आहे, असे स्पष्ट झाले. डब्ल्यूएचओ आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने केलेल्या अभ्यासातून हे समोर आले की, बहुसंख्य पीड़ित (७२ टक्के) पुरुष होते आणि मध्यम वयातील किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे होते. अभ्यासानुसार अनेक वेळा अशा लोकांचा मृत्यू १० वर्षांनंतरही होतो.
हा अभ्यास १९४ देशांकडील आकडेवारीवर आधारित आहे. अभ्यासानुसार आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास हृदयविकाराचा धोका ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ३५-४० तासांच्या तुलनेत हृदयविकाराने मृत्यूची जोखीम जास्त असते. हा अभ्यास २०००-२०१६ दरम्यान केला गेला. त्यामुळे यात कोरोनाग्रस्तांची संख्या नाही. एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये खूप जास्त वेळ काम करण्यामुळे आयुष्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल जगात हा पहिला अभ्यास एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये जाहीर झाला आहे.
... हा तर आरोग्यासाठी धोकासंघटनेच्या पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि आरोग्य विभागाच्या संचालक मारिया नीरा म्हणाल्या की,“ दर आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणे आरोग्यासाठी गंभीर असा धोका आहे. आम्ही ही माहिती कामगारांना जास्त सुरक्षा मिळावी म्हणून देत आहोत.”