नवी दिल्लीः एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या, असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलं आहे. तसेच तेलंगणामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर स्थानिकांना त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचं अपील केलं आहे. काँग्रेसच्या लोकांजवळ भरपूर पैसा आहे. तो त्यांच्याकडून मिळवा. तो पैसा माझ्यामुळे तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या आणि फक्त मला मतदान करा. जर तुम्हाला ते लोक पैसे देत असतील तर घ्या, काँग्रेसनं आपला दरही वाढवला पाहिजे. माझी किंमत फक्त दोन हजार ठरवू नये, मी त्याहून अधिक मूल्यवान आहे, असा टोलाही ओवैसींनी काँग्रेसला हाणला आहे. 12 जानेवारीला तेलंगणातल्या भैंसामध्ये दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. ज्यात 13 घरं आणि 26 वाहनं जळून बेचिराख झाली होती. या घटनेसंदर्भातही ओवैसींनी यांनी निषेध नोंदवला आहे. ओवैसी म्हणाले, ही घटना निषेधार्ह होती. मी मुख्यमंत्र्यांकडे अपील करतो की, आरोपींविरोधात कारवाई करा, ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, त्यांना लवकरात लवकर भरपाई द्या. तसेच भैंसाच्या जनतेनंही शांतता कायम ठेवावी, असं अपीलही त्यांनी केलं आहे.
काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या; असदुद्दीन ओवैसींचं अजब तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:44 AM
एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
ठळक मुद्देएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेकाँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या, असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलं आहे. तेलंगणामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर स्थानिकांना त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचं अपील केलं आहे.