हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येथील एआयएमआयमचे प्रमुख असुद्दुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. निकालापूर्वीच एमआयएमने टीआरएससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तसेच काँग्रेसला याबाबत इशाराही निवडणुकांपूर्वीही एमआयएमने टीआरएससोबत हातमिळवणी करुन संगणमताने जागा लढवल्या होत्या.
तेलंगणात केसीआरच्या टीआरएस पक्षाचेच कार्यकर्ते विजयाचा गुलाल उधळतील, असे चित्र एक्झिट पोलनंतर दिसत आहे. त्यामुळे टीआएरएस कार्यकर्ते विजयी जल्लोषाच्या तर नेते सत्तास्थापनेच्या मागे लागले आहेत. मात्र, काँग्रेसने एमआयएमला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तेलंगणात टीआरएसला मदत करण्यासाठी भाजापा पुढे येत असेल, तर काँग्रेसला साथ देण्यासाठी एमआयएम हात देईल, असे काँग्रेस नेते जी.एन. रेड्डी यांनी म्हटले. मात्र, ओवैसी यांनी निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. तसेच केसीआर यांना बाहेरुन पाठींबा देणार असल्याचेही, असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारमध्ये एमआयएम पक्षाला संधी मिळणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, असुद्दुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली असून टीआरएसला समर्थन देण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.