शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

ओवैसींनी काढला नरेंद्र मोदींचा बाप

By admin | Published: July 03, 2017 4:33 PM

औवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते मुस्लिमांना धर्माच्या आधार मतदान करण्याचं आवाहन करत आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीम पार्टीचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा भाऊ आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा वादात आहेत. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्युनिअर अकबरुद्दीन औवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते मुस्लिमांना धर्माच्या आधार मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना अपशब्दही वापरले आहेत. विशेष म्हणजे असदुद्दीन ओवैसी नेहमीच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर धार्मिक राजकारण करत असल्याचा आरोप करत असतात. 
 
व्हिडीओमध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी अखलाक, जुनैद आणि अन्य दुस-या मुस्लिमांच्या हत्या आणि होणा-या हल्ल्यांचा उल्लेख केला आहे. देशातील सगळे धर्मनिरपेक्ष लोक कुठे आहेत ? असा सवालही यानिमित्ताने ते विचारत आहेत.
 
ओवैसी यांनी विचारलं आहे की, "मुस्लिमांना समान दर्जा नाही का ? म्हणूनच त्यांच्यासोबत असा व्यवहार केला जात आहे का ? डोक्यावर टोपी घालणे, दाढी ठेवणे किंवा मुस्लिम असणं गुन्हा आहे का ?" 
 
पुढे बोलताना ओवैसी यांनी गरळ ओकत म्हटलं आहे की, "ए विश्व हिंदू परिषद, नरेंद्र मोदी...हा देश तुमच्या बापाची मालमत्ता नाही. जेवढा हा देश तुमचा आहे, तेवढाच माझाही आहे". ओवेसी पुढे म्हणतात, "कोणाचे उपकार, मदतीची आम्हाला गरज नाही. मुसलमानांनी ठरवलंच, जर ते उभे राहिलेच तर  आमचे मुसलमान भाऊ, आपल्या मुसलमान भावांना मतदान करुन, देशभरात 50 खासदार निवडून आणू शकतात".