शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Corona Vaccine: मोठी बातमी! भारताकडून सीरमच्या कोविशील्ड लसीच्या वापरास मंजुरी

By कुणाल गवाणकर | Published: January 01, 2021 5:43 PM

Corona Vaccine: ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीचा निर्णय

नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना मोठी बातमी मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरू होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीनं घेतला आहे. ब्रिटिश सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. ब्रिटन हा ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीला परवानगी देणारा पहिली देश ठरला. ब्रिटननं याच आठवड्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमनं आतापर्यंत लसीचे ५ कोटी डोज तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध होईल.सीरमची लस साठवण्यास सोपीकोरोनाची लस विशिष्ट तापमानात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तिची परिणामकारकता कमी होऊ शकते. सीरमच्या कोविशील्ड सोबत फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसी स्पर्धेत होत्या. मात्र फायझरची लस उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. तर मॉडर्नाची लस साठवण्यासाठी डीप फ्रीजरची आवश्यकता असते. ऑक्सफर्डची लस मात्र सामान्य फ्रीजमध्येदेखील ठेवता येऊ शकते.भारतासारख्या खंडप्राय देशासाठी कोरोना लसींचं उत्पादन करणं आणि त्यांचं वितरण करणं आव्हानात्मक आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकानं लसीच्या उत्पादनासाठी सीरमसोबत करार केला. पुण्यात मुख्यालय असलेली सीरम जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतातच लसींचं उत्पादन होत असल्यानं वितरण जास्त सुलभ होईल. देशात पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस टोचण्यात येणार आहे.उद्यापासून देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'देशातील प्रत्येक राज्यात उद्या २ जानेवारीपासून 'ड्राय रन' करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या