भारतीय चित्रपट आणि गाण्यांमध्ये येणाऱ्या अय्यो या शब्दासह १२ भारतीय शब्दांचा आॅक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. आॅक्सफर्ड डिक्शनरीत भारतीय शब्द समाविष्ट होण्याची ही पहिली वेळ नाही. भारतीय खाद्यपदार्थांच्या जागतिक लोकप्रियतेमुळे यापूर्वीही अनेक भारतीय शब्दांना या डिक्शनरीत स्थान मिळाले आहे. आॅक्सफर्डमध्ये स्थान मिळालेले १२ भारतीय शब्द आणि त्यांचे अर्थ पुढीलप्रमाणे.अय्योअय्यो या शब्दाचा अर्थ अय्या वा अरेच्चा असा आहे. दक्षिण भारतीय भाषांत दु:ख, आनंद, आश्चर्य भावना व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो.बदमाशबदमाश हा शब्द उर्दूतून आला आहे. पर्शियन बद (दुष्ट) आणि अरेबिक माश (जगण्याची पद्धत) याच्या संकरातून हा शब्द तयार झाला आहे. चुडीदारचुडीदार या शब्दाचा इंग्रजीतील वापर १८८० मध्ये पहिल्यांदा आढळून आला होता. हा शब्द अधिकृतरीत्या इंग्रजी भाषेत समाविष्ट होण्यासाठी १३५ वर्षे लागली. पक्कापक्का हा भारतीय शब्द आहे. डिक्शनरीत या शब्दाचे दिलेले अर्थ अस्सल, उत्कृष्ट आणि योग्य असे आहेत. भारतात शिजलेला, पिकलेला वा लबाड या अर्थानेही पक्का हा शब्द वापरला जातो.भेळपुरी, चटणी, घी (शुद्ध तूप), ढाबा, मसाला, पुरी हे शब्दही आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आले आहेत. दीदी या शब्दानेही स्थान मिळवले आहे. यानंतर आॅक्सफर्डमध्ये लवकरच भैया या शब्दाचाही समावेश होईल, अशी चिन्हे आहेत. मित्र-मैत्रिणीला वा प्रियकराला सर्रास यार म्हटले जाते. इतकेच काय, अरे यार, असे सहजपणे म्हटले जाते. तो यारही आॅक्सफर्डमध्ये जमा झाला आहे.
‘अय्यो’सह १२ भारतीय शब्द आॅक्सफर्ड डिक्शनरीत
By admin | Published: January 12, 2017 12:55 AM