शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Oxygen Shortage: दिलासा! गुजरातमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली; गोयल यांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 9:50 PM

Oxygen Shortage: गुजरातमधील हापा येथून कळंबोलीसाठी आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रवानारेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची ट्विटरवरून माहिती११० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन मिळणार

अहमदाबाद: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेत देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. विशाखापट्टनमनंतर आता गुजरातमधूनमहाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून दिली आहे. (oxygen shortage oxygen express departed from hapa gujarat to maharashtra)

देशभरातील राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. यामुळे ऑक्सिजनचा साठा अपुरा पडत आहे. सर्वप्रथम विशाखापट्टनम येथून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यात आली. अलीकडेच ती महाराष्ट्रात पोहोचली असून, आता गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती देत ऑक्सिजन एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  

गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली

गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे. ही एक्स्प्रेस ट्रेन महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेला वाढवेल. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यास मदत होईल, असे पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

“कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र

११० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन मिळणार

विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे  ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली होती. यापैकी ३ टँकर नागपूरमध्ये तर उर्वरित नाशिकला देण्यात आले आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून ५ दिवसांत ११० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे. यापुढील काळातही ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनpiyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वेGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र