नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात गंभीर आणि भीतीदायक वातावरण बनत चालले आहे. तसेच कोरोना लसीकरणाचा तुटवडाही अनेक राज्यांमध्ये जाणवू लागला आहे. देशातील दोन कंपन्यांच्या लसीचे डोसचे उत्पादन देशवासीयांच्या क्षमतेपेक्षा अत्यल्प असल्याने परदेशातील लसींना परवागनी देण्यात आली आहे. या एकंदर घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार कोरोना लसींच्या किमतीवरून नफेखोरी वाढवण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. (p chidambaram criticised modi govt on corona vaccine price)
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोना लसींच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित केल्या जात नाहीयेत. तसेच राज्य सरकारलाही त्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, अशी टीका चिदंबरम यांनी केली.
“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”
राज्यांना मोठे नुकसान होतेय
एकीकडे राज्यांचे महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तसेच त्यांना जीएसटीचा वाटा केंद्राकडून दिला जात नाहीये. मर्यादित संसाधने असणाऱ्या छोट्या राज्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. राज्यांची कर्जे वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना लसींचे डोस निश्चित किमतीत मिळत नाहीयेत, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.
अनिल अंबानींची 'ही' कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला
पीएम केअर फंडाच्या रकमेचे काय झाले?
पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान केअर फंडावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. पीएम केअर फंडात जमा झालेली कोट्यवधींच्या रकमेचे नेमके काय झाले, याची कुणालाही माहिती नाही, असे टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.
दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.