नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना विशेष व दिल्ली उच्च न्यायालयाने एअरसेल मॅक्सीस व्यवहार व आयएनएक्स मिडिया भ्रष्टाचार खटल्यात बुधवारी मोठा दिलासा दिला.विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सीस खटल्यात चिदंबरम यांना पाच जूनपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला. आयएनएक्स खटल्यात चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय गुरुवारी सुनावणी घेणार आहे.एअरसेल मॅक्सीसचा व्यवहार ३,५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मिडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (युपीए-१) अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (एफआयपीबी)हिरवा कंदील वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता व त्याचवेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत.
पी. चिदंबरम यांना ५ जूनपर्यंत अटक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:57 AM