नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले आहेत. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाची भूमिका होत नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला आणखी स्वायत्तता देण्याची मागणी केली होती. त्याचा भाजपानं निषेध नोंदवला आहे. जम्मू-काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते कायम राहील. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत हे काँग्रेसचंही मत असल्याचं मानणं योग्य ठरणार नाही, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत.परंतु भाजपा चिदंबरम यांच्या या विधानावरून आक्रमक झालीय. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी चिदंबरम यांच्यासह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही धारेवर धरलं आहे. चिदंबरम यांचं वक्तव्य हे भारताला तोडण्याचं आहे, हे धक्कादायक व भयंकर आहे. पी. चिदंबरम हे भारताला तोडण्याची भाषा करत असून, जम्मू-काश्मीरमध्ये जवानांची हत्या करणा-या दहशतवाद्यांना ते समर्थन देत आहेत. जेणेकरून जम्मू-काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल, असंही स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. चिदंबरम यांचं विधान हे काँग्रेस पक्षाची मानसिकता दर्शवत असल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला चांगलंच फटकारलं आहे. त्याप्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनीही चिदंबरम यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, 1947ची काँग्रेसची सदोष नीतीच काश्मीरच्या समस्येला जबाबदार आहे. काश्मीरची समस्या ही काँग्रेसकडून वारशानं चालत आली आहे. स्वतःच्या जुन्या चुकीच्या धोरणांतून शिकण्याऐवजी काँग्रेस देशातील संकटं वाढवण्याचं काम करतोय. काँग्रेस पूर्ण देशासोबत गद्दारी करतोय. तो जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देतोय. स्वातंत्र्य किंवा स्वायत्ततेसंदर्भात चिदंबरम यांनी जी भूमिका मांडली आहे ती भारताच्या राष्ट्रीय हितांना बाधा पोहोचवणारी आहे, असंही जेटली म्हणाले आहेत.शनिवारी गुजरातमधील राजकोटमध्ये एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. जम्मू-काश्मीरच्या लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असं जाणवलं की, जेव्हा ते स्वातंत्र्याची मागणी करतात तेव्हा खरं तर तेथील लोकांना स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता हवी आहे.
पी. चिदंबरम यांच्या काश्मीर 'स्वातंत्र्या'वरील टिपण्णीवरून काँग्रेसनं झटकले हात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 8:08 AM
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले आहेत.
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाची भूमिका होत नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं.1947ची काँग्रेसची सदोष नीतीच काश्मीरच्या समस्येला जबाबदार आहे. काश्मीरची समस्या ही काँग्रेसकडून वारशानं चालत आली