शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

पान 7- आदिवासी विकास परिषद सोहळा उत्साहात

By admin | Published: September 06, 2015 11:54 PM

कुंकळ्ळी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि गोवा आदिवासी विकास परिषदतर्फे आयोजित गोवा आदिवासी विकास परिषद उद्घाटन सोहळा (दि. 5) सीडीओ पॅराडाइज सभागृह केपे येथे पार पडला. सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.

कुंकळ्ळी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि गोवा आदिवासी विकास परिषदतर्फे आयोजित गोवा आदिवासी विकास परिषद उद्घाटन सोहळा (दि. 5) सीडीओ पॅराडाइज सभागृह केपे येथे पार पडला. सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमजीभाई डामोर, माजी खासदार व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे अध्यक्ष जागन सिंग कुलासो, माजी मंत्री व एम. पी. उपाध्यक्ष अर्जुन मीना, प्रकाश शंकर वेळीप, यशवंतसिंग दरबार, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, सतीश वेळीप सचिव, सहसचिव दुर्गादास गावडे, खजिनदार अँथनी वाझ, सदस्य डॉ. उदय गावकर, सतीश भट, सतीश वेळीप व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश वेळीप म्हणाले, शैक्षणिक, संस्कृती, आरोग्य, उद्योजक यासारख्या विकासासाठी राबवलेली परिषद आदिवासी जनतेसाठी महत्त्वाची पायरी आहे. या कार्यक्रमामुळे महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासांना बळकटी मिळतात. गोव्यामध्ये ही परिषद आदिवासींच्या तरुण पिढीला प्रोत्साहन करण्यासाठी लाभदायक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
वासुदेव मेंग गावकर म्हणाले, सहकार क्षेत्रात आणि आदिवासी लोकांसाठी प्रकाश शंकर वेळीप यांचे मार्गदर्शन उल्लेखनीय आहे. प्रकाश वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा आदिवासी (एससीएसटी) एक थरावर जाऊन पोचलेली आहे.
यशवंत सिंग दरबार म्हणाले, आदिवासी विकास परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी प्रोजेक्ट चालू केले आहे. या प्रोजेक्टच्या साहाय्याने आदिवासी लोकांना नोकरी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात साहाय्यता मिळेल. त्यामधून नोकरीची संधी निर्माण करण्यात येईल. या प्रोजेक्टमुळे आदिवासी समाजाला दिशा मिळेल. तसेच त्यांच्या विकासासाठी साहाय्यता मिळेल. तसेच पारंपरिक रीतीरिवाज, विकास विविध राज्यांमध्ये विविधता त्यांचे विचार भव्य विकासासाठी फायद्याचे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी राजस्थानचे खासदार अर्जुन मीना, सोमजीभाई डामोर यांनीही मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, अँथनी वाझ यांचा आदिवासी समाजामध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मानपत्र, पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उदय गावकर यांनी केले. डॉ. वल्लभ फळदेसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
फोटो : केपे येथे आयोजित के लेल्या आदिवासी विकास परिषद सोहळ्यात उपस्थित मान्यवर.