नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली. गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला (Microsoft Satya Nadela) यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. याशिवाय काँग्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचाही पद्मभूषण पुरस्कारनं सन्मान केला जाणार आहे.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण, बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांना पद्मभूषण, माजी गृहसचिव राज राजीव महर्षी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय भारत बायोटेकचे संस्थापक कृष्ण लीला आणि त्यांच्या पत्नीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नीरज चोप्रा यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.