प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (25 जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी 2023 साठी 106 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावेळी 19 महिलांना पद्म पुरस्कार देण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, समाजवादी पक्षाचे संरक्षक तथा यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
बालकृष्ण दोसी आणि पश्चिम बंगालचे डॉ दिलीप महलानोबीस यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ दिलीप महलानोबीस यांना ओआरएसच्या शोधासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय, संगीतकार झाकिर हुसेन, एसएम कृष्णा, श्रीनिवास वरधान यांनाही पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री - पद्म भूषण मिळालेल्या 9 जणांमध्ये सुधा मूर्ती आणि कुमार मंगलम बिर्ला यांचाही समावेश आहे. राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर), आरआरआर फिल्म संगीतकार एमएम किरावनी, अभिनेत्री रवीना रवी टंडन यांचा पद्मश्री मिळालेल्या 91 जणांमध्ये समावेश आहे. याच बरोबर हीरा बाई लोबी यांना गुजरातमध्ये सिद्धी ट्राइब्सच्या मुलांसाठी शिक्षणासंदर्भात काम केल्याबद्दल पद्मश्री ने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते -
पद्मविभूषण झाकीर हुसेनपद्मभूषण सुमन कल्याणपूरपद्मभूषण दिपक धरपद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला
पद्मश्री प्रभाकर मांडेपद्मश्री रमेश पतंगेपद्मश्री भूिकू रामजी इदातेपद्मश्री परशुराम खुणेपद्मश्री गजानन मानेपद्मश्री राकेश झुनझुनवालापद्मश्री कुमी नरीमन वाडिया पद्मश्री रविना टंडन