पान १- शिवसेनेत बदल
By admin | Published: November 21, 2014 10:38 PM
राऊत, देसाईंसह चौघांना प्रवक्तेपदावरून हटविले
विधानसभा निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर निवडीच्या विषयांवर चर्चा होत्या़ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले महापौरपद मिळविण्यासाठी इच्छक तीन जणांनी नेत्याकडे लॉबिंगही केली़ एकमेकांचे उणे-दुणेही काढण्याचा प्रयत्न झाला़ आपणच कसे सरस आहोत, याबाबत दूत पाठवून नेत्याला पटविण्याचा कार्यक्रमही जवळपास पंधरा दिवस चालू होता़ विधानसभा निवडणुकी अगोदरच आरक्षण जाहिर झाल्याने ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये नेत्यांनी स्पर्धा लावली़ विधासभा निवडणुकीचा निकाल बाहेर येताच अनेकांचे प्रभाग मायनस गेल्याने आपली संधी हुकते काय? असा प्रश्न इच्छुकाला भेडसावत होता़ त्याउपरही लॉबिंग करीत पक्ष पदाधिकार्यांशी हातमिळवणी करीत महापौरपदासाठी अखेरपर्यंत रस्सीखेच केली़ दिग्गजांमध्ये लागलेल्या स्पर्धेत स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री यांना महापौरपदाची संधी मिळाली़ काँग्रेसचे संख्याबळ अधिक असले तरी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने अख्तर मिस्त्री बिनविरोध निवडून आले़ त्याचदिवशी स्थायी समितीच्या सभापतीपदी आता कोण? अशी चर्चा सुरू झाली़ नूतन महापौर मिस्त्री यांनी शुक्रवारी पदभार घेतला़ त्यामुळे आता पहिली सर्वसाधारण सभा कधी होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे़ काँग्रेसचे सोशल इंजिनिअरिंग़़़जातीय समिकरणांंचा मेळ घालण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी नेत्याकडे आग्रह धरला आहे़ मतदानाचा अधिक टक्का असलेला समाज नाराज होणार नाही, याची दखल घेतली जाईल, अशी चर्चा आहे़ मनपात स्थायी समितीचे सभापतीपद सर्वाधिक महत्वाचे आहे़ काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख, डॉ़ रूपाली सोळुंके, रविशंकर जाधव, ॲड़ किशोर राजुरे यांच्या नावाची चर्चा आहे़ मात्र, माजीमंत्री आ़ दिलीपराव देशमुख, माजीमंत्री आ़ अमित देशमुख सूचवतील त्यालाच स्थायी समितीच्या सभापतीपदाची संधी मिळणार आहे़ उच्च विद्याविभुषित असलेल्या डॉ़ रूपाली सोळुंके यांच्या नावाला सभापतीसाठी संमती मिळणार असून ॲड़ किशोर राजुरे यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे़पहिल्याच सभेत निवड़़़नूतन महापौर अख्तर मिस्त्री हे स्थायी समितीचे सभापती होते तर उपमहापौर कैलास कांबळे हे स्थायीत सदस्य होते़ दोघांनीही स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे़ त्यामुळे स्थायी समितीत काँग्रेसचे दोन सदस्य नवे येणार आहेत़ नव्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणार्या पहिल्याच सर्वसाधारणसभेत स्थायी समितीच्या सभापतीची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे़ सध्या स्थायी समितीचे सभापतीपद रिक्त असल्याने चार ते पाच दिवसांत सर्वसाधारण सभा होणार असल्याचेही सांगितले जात आहे़