११/७ बॉम्बस्फोटप्रकरणी१२ आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तताफाशी की जन्मठेप? : सोमवारपासून युक्तिवाद मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एक आरोपीची निर्दोष सुटका केली. दोषी आरोपींना काय शिक्षा ठोठावावी, यावर येत्या सोमवारपासून युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय या आरोपींची शिक्षा जाहीर करेल. अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान अशी दोषी आरोपींची नावे असून अब्दुल शेख याला पुराव्यांअभावी निर्दोष ठरविण्यात आले आहे. या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे केली जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वे गाड्यांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक असे बोरीवली, मिरा-भाईंदर, जोगेश्वरी, खार, वांद्रे, माहिम व माटुंगा रोड येथे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर याची सुनावणीही सुरू झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकार्यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. तसेच जवळपास साडेपाच हजार पानांचा मजकूर असलेला पुरावा न्यायालयात सादर झाला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात याची सुनावणी पूर्ण झाली. (प्रतिनिधी)................................असे घडले बॉम्बस्फोट :बोरीवली - संध्या ६.२८ -विरार फास्ट -२६ ठार -१५३ जखमीमीरा भाईंदर - संध्या ६.३१ - विरार फास्ट - ३१ ठार -१२२ जखमीजोगेश्वरी -संध्या ६.२४ -बोरीवली स्लो -२८ ठार -११५ जखमीखार रोड -संध्या ६.२५ -बोरीवली स्लो -९ ठार -१०२ जखमीवांद्रे - संध्या ६.२३ -बोरीवली सेमी फास्ट -२२ ठार -१०७ जखमीमाहिम -संध्या ६.२३ -बोरीवली सेमी फास्ट -४३ ठार -९६ जखमीमाटुंगा रोड -संध्या ६.२४ -विरार फास्ट -२८ ठार -१२२ जखमी
पान १ - मुख्य बातमी
By admin | Published: September 11, 2015 9:24 PM