पान २ :शेड पाडा
By admin | Published: April 11, 2015 1:40 AM
नागझर येथील ती शेड पाडा
नागझर येथील ती शेड पाडागोवंश रक्षा कार्यकर्त्यांची मागणीडिचोली : नागझर येथे गुरांची बेकायदा कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारी शेड पाडण्यात यावी. गोवंश रक्षा कार्यकर्ते ही शेड मोडतील, असा इशारा गोवंश रक्षा कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.नागझर येथील शेडमध्ये २००८ साली या शेडमध्ये बेकायदा गुरांची कत्तल होत असल्याची पोलिसांत तक्रार नोंदविली होती. दरम्यान, ही शेड बेकायदा असल्यामुळे ती पाडावी, असा ठरावही पालिकेने घेतला होता; परंतु या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही, उलट ही शेड दुरुस्त करण्यास पालिकेने परवानगी दिली. दोन दिवसांपूर्वी या शेडमध्ये गुरांची कत्तल सुरू असताना पोलिसांसह गोप्रेमींनी छापा टाकला, तसेच या संदर्भात तक्रार देऊनही अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याचे कमलेश बांदेकर यांनी सांगितले. गोवंश रक्षा समितीचा लढा सनदशीर मार्गाने सुरू असून सरकारने गोवंश रक्षणासाठी गंभीरतेने पावले उचलावीत अन्यथा गोप्रेमींना आक्रमक लढा देणे भाग पडेल, असेही या वेळी सांगण्यात आले. भारत स्वाभिमानचे कमलेश बांदेकर, प्राणीमित्र अमृतसिंग, राष्ट्रीय गोरक्षा सेनेचे भगवान हरमलकर, नगरसेवक कमलाकर तेली, संदीप सुतार, आनंद नार्वेकर आदींची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. (लो. प्र.)उपजिल्हाधिकार्यांना निवेदनबेकायदा शेड तसेच गुरांची कत्तल रोखण्यासंदर्भात निवेदन डिचोली उपजिल्हाधिकारी तथा पालिका मुख्याधिकारी महादेव आरोंदेकर यांना सादर केले आहे. या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.फोटो : डीएससीएफ ७८७८पत्रकारांना माहिती देताना कमलेश बांदेकर, अमृतसिंग, भगवान हरमलकर, कमलाकर तेली व इतर. (दुर्गादास गर्दे)