पान 2 - पर्यटन मास्टर प्लॅन जानेवारीपर्यंत -दिलीप परुळेकर :
By admin | Published: August 14, 2015 12:05 AM
पणजी : पुढील 25 ते 30 वर्षे पर्यटन क्षेत्रासाठी दिशा दाखवणारा मास्टर प्लॅन येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत संबंधित सर्व घटकांकडून सूचना मागवून आवश्यक त्या सूचनांचा अंतर्भाव करून हा प्लॅन (आराखडा) मार्गी लावला जाईल, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी विधासभेत स्पष्ट केले.
पणजी : पुढील 25 ते 30 वर्षे पर्यटन क्षेत्रासाठी दिशा दाखवणारा मास्टर प्लॅन येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत संबंधित सर्व घटकांकडून सूचना मागवून आवश्यक त्या सूचनांचा अंतर्भाव करून हा प्लॅन (आराखडा) मार्गी लावला जाईल, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी विधासभेत स्पष्ट केले. जानेवारी 2016 नंतर दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. गोव्यातील कचरा समस्येमुळे विदेशी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतात, असे निदर्शनास आल्यावर किनारी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. 14 कोटींचे कंत्राट दिले आहे. त्यात कोणताही गैरव्यवहार नाही, असा दावा करताना परुळेकर म्हणाले की, कंपनीला कचरा उचलण्यापासून बाकीचीही जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे कामाचा खर्च वाढलेला आहे. फोंडा येथे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट इमारतीचे काम 30 टक्के झालेले आहे. पुढील मे महिन्यापर्यंत तेथे वर्ग सुरू होतील.-राज्यात 3069 हॉटेल्स असून गेल्या काही काळात 270 नव्या हॉटेलांची त्यात भर पडली आहे.- 84 नव्या ट्रॅव्हल एजन्सी आल्या असून 440 ट्रॅव्हल एजन्सींमध्ये याची भर पडली आहे.- 14,077 टुरिस्ट टॅक्सींमध्ये 1583 टुरिस्ट टॅक्सींची भर पडली आहे. -जलक्रीडा घेणार्यांची संख्या 1114 होती. त्यात 127 नव्या ऑपरेटर्सची भर पडली आहे. -दिल्ली-गोवा थेट रेल्वेगाडीसाठी केंद्रात प्रयत्न चालू केले आहेत. -महिला टॅक्सींना उत्तम प्रतिसाद मिळतो.-पंचतारांकित हॉटेलमधील शाही विवाहांचे प्रमाण गोव्यात वाढत आहे. -2013-14 मध्ये 600 शाही विवाह गोव्यात झाले.-2014-15 मध्ये ही संख्या 720 इतकी होती. या वर्षी 850 शाही विवाहांचे उद्दिष्ट आहे.-एका विवाह सोहळ्य़ावर 10 कोटी रुपयांपर्यंत खर्च केले जातात. यातून सरकारला अप्रत्यक्ष महसूल मिळतो. -पर्यटन उद्योगाशी संबंधित वाहने किंवा हॉटेल्सची ऑनलाईन नोंदणीची सोय येत्या जागतिक पर्यटनदिनापासून सुरू होईल. -जीवरक्षकांनी गेल्या वर्षभरात 414 जणांना बुडताना वाचविले. 793 जीवरक्षक किनार्यांवर कार्यरत आहेत. -2011 साली 26 लाख 70 हजार 937, 2012 मध्ये 27 लाख 87 हजार 29, 2013 साली 31 लाख 49 हजार, 2014 साली 40 लाख 58 हजार 56, 2015 मध्ये मार्चपर्यंत 8 लाख 20 हजार देशी-विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. विदेशी पर्यटकांची संख्या घटलेली नाही. -ई-व्हिसाचा 17 हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांनी लाभ घेतला. 15 तारखेला येणार असलेल्या नव्या यादीत इंग्लंड व आणखी 35 देशांतील पर्यटकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. ई-व्हिसाला प्रत्येकी 107 पौंड शुल्क आकारले जाते, ते कमी करून 36 पौंडांवर आणण्यात आले. त्यामुळे इंग्लंडचे पर्यटक वाढतील. (प्रतिनिधी)