पान ३ : सांकवाळ सरपंचांविरुध्द अविश्वास ठराव दाखल
By admin | Published: July 03, 2015 11:00 PM
वास्को : सांकवाळचे सरपंच शरण मेी यांच्याविरोधात नऊ सदस्यांनी शुक्रवारी अविश्वास ठरावाची नोटीस मुरगाव तालुका गट विकास अधिकारी कार्यालयात दिली आहे.
वास्को : सांकवाळचे सरपंच शरण मेी यांच्याविरोधात नऊ सदस्यांनी शुक्रवारी अविश्वास ठरावाची नोटीस मुरगाव तालुका गट विकास अधिकारी कार्यालयात दिली आहे.या पंचायतीत ११ सदस्य असून त्यापैकी एका पंचाने जिल्हा पंचायतीवर निवड झाल्याने राजीनामा दिला आहे़ गुरुवारी सरपंच शरण मेी यांनी आपल्या पदाचा राजीनामा गट विकास अधिकार्याकडे सादर केला होता़ मात्र, पंचायत कायद्यानुसार सरपंचाला आपला राजीनामा पंचायत संचालकांकडे देणे अपरिहार्य आहे़ याबाबत पंच रमाकांत बोरकर यांना विचारले असता, शरण मेी यांच्या कारकिर्दीत या पंचायतीची विकासकामे अडल्याचा दावा केला. तसेच ७ जूनपर्यंत त्यांनी सरपंचपदी राहावे, असे अलिखित ठरलेे होते; पण जुलै उजाडला तरी त्यांनी राजीनामा दिला नसल्याने पंच नाराज होते़ त्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणे भाग पडले आहे, असे त्यांनी सांगितले़ नव्या सरपंच निवडीबाबत सर्व सदस्य संघटितपणे निर्णय घेतील, असे ते पुढे म्हणाले. (प्रतिनिधी)