पान 3 : वाहतूक नियम आता अभ्यासक्रमात
By admin | Published: September 04, 2015 10:45 PM
लक्ष्मीकांत पार्सेकर : पर्वरीत वाहतूक व्यवस्थापन परिसंवाद
लक्ष्मीकांत पार्सेकर : पर्वरीत वाहतूक व्यवस्थापन परिसंवादपणजी : वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांत जागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयीन पातळीवर वाहतूक व्यवस्थापन व नियम विषयाचा अभ्यासक्रमात सरकार समावेश करण्यात येईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. गोवा विधिकार मंचतर्फे पर्वरी येथे विधानसभेच्या सभागृहात आयोजित केलेल्या गोव्यातील ‘वाहतूक व्यवस्थापन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे, उद्योगमंत्री महादेव नाईक आणि गोवा विधिकार मंचचे सचिव व्हिक्टर गोन्साल्विस उपस्थित होते. या प्रस्तावावर पोलीस, वाहतूक व शिक्षण या खात्यांशी सल्लामसलत करणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. काणकोण ते पेडण्यापर्यंत कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करून मोपा विमानतळही त्याला जोडण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गावर शटल रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. जेणे करून वाहतूक अपघात कमी होतील, असे मत मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मांडले. वाहतूक सुरक्षे बाबत विद्यार्थ्यांमध्दे जागृती होण्याकरीता या विषयाचा समावेश् करण्याचा प्रस्ताव या वेळी सभापती आर्लेकर यांनी मांडला होता. काणकोण ते पेडणे व फोंडा ते पणजी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर जास्त प्रमाणात अपघात घडतात आणि ते कमी करण्यासाठी येथे सहा पदरी महामार्ग उभारण्यासाठी सरकाराचे विचार करण्याची आवश्यकता अहे असे विरोधी पक्षे नेते राणे यांनी म्हटले. वाहतूक सुरक्षेसाठी सरकाराने पहिले प्राधान्य द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सूरवातीला विक्टर गोन्साल्विस यांनी स्वागत केले. प्रतिनिधी