पान 3 : कटमगाळ-बांदोड्यातील बेकायदा काम ग्रामस्थांनी रोखले
By admin | Published: August 02, 2015 10:55 PM
राजकीय आशिर्वादाने काम चालल्याचा स्थानिकांचा दावाफोंडा : ग्रामस्थांचा तीव्र विरोध असूनही व स्थानिक पंचायतीने दिलेला ना हरकत दाखल मागे घेऊनही बांदोडा पंचायत क्षेत्रातील कटमगाळ येथील कोमुनिदाद जागेत आज सकाळपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम स्थानिकांनी संध्याकाळी बंद पाडले.कटमगाळ येथील् नियोजित मेगा प्रकल्पाच्या जागेत जेसीबी मशिनच्या सहाय्याने ...
राजकीय आशिर्वादाने काम चालल्याचा स्थानिकांचा दावाफोंडा : ग्रामस्थांचा तीव्र विरोध असूनही व स्थानिक पंचायतीने दिलेला ना हरकत दाखल मागे घेऊनही बांदोडा पंचायत क्षेत्रातील कटमगाळ येथील कोमुनिदाद जागेत आज सकाळपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम स्थानिकांनी संध्याकाळी बंद पाडले.कटमगाळ येथील् नियोजित मेगा प्रकल्पाच्या जागेत जेसीबी मशिनच्या सहाय्याने काम सुरू होते. स्थानिकांना याबाबत माहिती मिळताच संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास स्थानिकांनी सदर काम थांबवण्यास भाग पाडले. कटमगाळ येथील कोमुनिदाद जागेत मेगा प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. बांदोडा पंचायतीच्या गेल्या अनेक ग्रामसभांत सदर प्रकल्पाचा विषय चर्चेस येत असून ग्रामस्थांनी पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला मागे घेण्यास भाग पाडले आहे. तरीही सदर वादग्रस्त जागेत बेकायदेशीरपणे जेसीबी मशिनच्या सहाय्याने काम सुरू केल्यामुळे यात महनीय तसेच राजकीय धेंडे गुंतल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सदर जागेतील काम बंद होते. मात्र आज रविवारची सुट्टी असल्याचा फायदा घेत सदर कामाच्या कंत्राटदाराने दोन जेसीबी मशिन आणि सुमारे 35 कामगारांसह सदर प्रकल्पाच्या जागेत रस्ता बनवण्याचे चालवल्याचे स्थानिकांना आढळून आले. याबाबत माहिती मिळताच गोविंद गावडे तसेच अन्य स्थानिकांनी कटमगाळीत जाऊन सदर कंत्राटदारांस काम बंद करण्यास भाग पाडले. यावेळी संबंधितांकडे कामासंबंधीची कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे दिसून आले. त्यामूळे सदर काम राजकीय आशिर्वादाने बेकायदेशीरपणे चालल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. याबाबत बोलताना गोविंद गावडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सदर घटनेतून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले. स्थानिकांच्या विरोधाला तसेच स्थानिक प्रशासन असलेल्या पंचायतीच्या आदेशाला न जुमानता सदर वादग्रस्त जागेवर बिनदिककतपणे काम सुरू झाल्यामुळे यात राजकीय वरदहस्त असल्याचे स्पष्ट होत असून सदर प्रकारासंबंधी सोमवारी मुख्र्यमंत्री, जिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस व इतर संबंधित यंत्रणांना निवेदने देण्यात येणार असून यापुढे असा प्रकार घडल्यास होणार्या परिणांमांना पूर्णपणे सरकार जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)ढँ3 : 0208-ढडठ-04कॅप्शन: कटमगाळ बांदोडयात ग्रामस्थांनी बेकायदेशीरपणे काम करताना अडवलेले जेसीबी मशिन.(छाया- शेखर नाईक)