पान 4- बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी कुणकेरीतील युवकाची चौकशी
By admin | Published: August 17, 2015 12:08 AM
बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी कुणकेरीतील युवकाची चौकशी
बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी कुणकेरीतील युवकाची चौकशीसावंतवाडी : सावंतवाडीसह कुडाळ न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी गोवा पोलिसांना करणारा युवक कुणकेरीतील असल्याच्या संशयाने पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले होते. मात्र, युवकाने आपले सीमकार्ड एक वर्षापूर्वीच हरवल्याचे पोलिसांना सांगितल्याने आता पोलीस सीमकार्डचा डाटा तपासणार आहेत, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी दिली आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत अन्य कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.सावंतवाडीसह कुडाळ न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा शुक्रवारी (दि. 14) पसरवण्यात आली. त्यानंतर जिल्?ातील पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती. पोलिसांसह बॉम्बनाशक पथकाने परिसराची झाडाझडती घेतली. मात्र, बॉम्बसदृश एकही वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे कळले; परंतु न्यायालयाचा तसेच पोलिसांचा मोठय़ा प्रमाणात वेळ वाया गेल्याचे यातून दिसून आले.पोलिसांनी या घटनेनंतर हा दूरध्वनी गोवा पोलिसांना कोठून आला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी हा दूरध्वनी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील युवकाच्या सीमकार्डमधून आल्याचे स्पष्ट झाले होते. तो युवक सध्या कोलगाव येथे राहात असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, युवकाने आपले सीमकार्ड एक वर्षापूर्वीच हरवल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.पोलिसांनी युवकाला सोडून दिले असले, तरी त्याच्यावर पोलिसांची नजर असणार आहे. पोलीस सीमकार्डचा डाटा शोधणार असून, हा डाटा तपासल्यानंतर पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि सावंतवाडी व कुडाळ पोलीस संयुक्तिकपणे तपास करीत आहेत. दरम्यान, आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसून, तपास सुरू असल्याचे सावंतवाडीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)