पान 4 : महाकाली मंदिर बांधण्यास नेरूलला ग्रामस्थ आक्रमक
By admin | Published: August 20, 2015 10:09 PM
बेती वेरे : नेरूल महाकाली मंदिरात तोडफोड करून देवीची मूर्ती व इतर साहित्य गायब केलेल्या व्यक्तींना पोलिसांनी तपास करून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली. काल झालेल्या तक्रारीनंतर देवस्थान मोडलेल्या स्थळी सकाळी ग्रामस्थ उपस्थित झाले. सरपंच शशिकला गोवेकर, पंच प्रकाश कळंगुटकर, दशरथ कळंगुटकर, महादेव रिवणकर, गजानंद नाईक, अँड. दिनेश आश्वेकर, विनायक मयेकर व इतर ग्रामस्थ हजर झाल्यानंतर देवस्थानच्या जागी बांधकाम साहित्य उतरू लागले.
बेती वेरे : नेरूल महाकाली मंदिरात तोडफोड करून देवीची मूर्ती व इतर साहित्य गायब केलेल्या व्यक्तींना पोलिसांनी तपास करून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली. काल झालेल्या तक्रारीनंतर देवस्थान मोडलेल्या स्थळी सकाळी ग्रामस्थ उपस्थित झाले. सरपंच शशिकला गोवेकर, पंच प्रकाश कळंगुटकर, दशरथ कळंगुटकर, महादेव रिवणकर, गजानंद नाईक, अँड. दिनेश आश्वेकर, विनायक मयेकर व इतर ग्रामस्थ हजर झाल्यानंतर देवस्थानच्या जागी बांधकाम साहित्य उतरू लागले. दरम्यान, पर्वरी, साळगाव, कळंगुट व हणजूण पोलीस स्थानकातील एक ताफा घटनास्थळी येऊन धडकला. पाठोपाठ डॉन बॉस्को संस्थेचे फादर व इतर पाच पदाधिकारी घटनास्थळी येताच ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. म्हापसाचे मामलेदार मधू नार्वेकर मंदिराच्या ठिकाणी उभे राहून बांधकाम थांबविण्याचा इशारा करू लागले. ग्रामस्थांतून जवळपास 500 महिलांनी त्यांच्याकडे जाऊन मंदिराच्या जागेवरून हटण्याची मागणी केली. त्याला अनुसरून मामलेदार जागेवरून हटून दूरवर उभे राहिले. त्यानंतर पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी मंदिर तोडफोडप्रकरणी अपराध्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी लगेचच पंचनामा केला व श्वानपथकाद्वारे मागोवा काढण्याचा प्रय} केला; परंतु काहीही सफल झाले नाही. उपजिल्हाधिकारी खोर्जुवेकर व उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी पोलीस निरीक्षक व मामलेदार यांच्याशी चर्चा करून ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलविले. झालेल्या चर्चेत जातीय दंगा किंवा सामाजिक शांतता भंग होऊ नये व शांततेत चर्चा व्हावी अशी विनंती खोर्जुवेकर यांनी ग्रामस्थांना केली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी कार्यालयात दोन्ही बाजूच्या व्यक्तींना चर्चेसाठी आमंत्रित केले. त्यावर आम्ही देवस्थान पूर्ण केल्यानंतर चर्चेसाठी तुमच्याकडे येऊ, असे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. प्रवीण शिरोडकर, विनायक मयेकर, राजेश कळंगुटकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने मूर्ती व साहित्याचा शोध घ्यावा, असा तक्रार अर्ज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. स्मशानभूमी समितीतर्फे बोलताना अध्यक्ष प्रकाश कळंगुटकर यांनी माजी उपसंचालक पंचायत संचालनालय व कोमुनिदादचे व्यवस्थापक दशरथ रेडकर यांची या प्रकरणी असलेली कृती संशयास्पद असून त्याविषयी चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (वार्ताहर)