पान 5- हरमलात आठ हट्स आगीच्या भक्षस्थानी; 15 लाखांचे नुकसान
By admin | Published: January 06, 2016 1:52 AM
हरमल : येथील खालचावाडा येथे आठ हट्स, स्टोअर रुम व मच्छिमारी साधने, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे 15 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशामन दल पोहोचण्यापूर्वी स्थानिकांच्या अथक प्रयत्नामुळे आग फैलावली नाही. सुदैवाने जीवितहानी टळली.
हरमल : येथील खालचावाडा येथे आठ हट्स, स्टोअर रुम व मच्छिमारी साधने, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे 15 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशामन दल पोहोचण्यापूर्वी स्थानिकांच्या अथक प्रयत्नामुळे आग फैलावली नाही. सुदैवाने जीवितहानी टळली. दुपारी 11.45च्या सुमारास र्शी नारा-- मणरेसन नजीक असलेल्या र्शी रामा अर्जुन बांदेकर यांच्या मालकीच्या हट्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आठ हट्स, एक स्टोअर रुम, त्यात मासे ठेवण्याच्या बॉक्सेस, जाळी (नेट्स) प्रत्येक हट्समध्ये संडास, खाट, खुच्र्या टेबले, आयफोन, लॅपटॉप, रेफ्रिजिरेट्स, तसेच रोख 35 हजार रुपये मिळून 15.50 लशखाचे नुकसान झाल्याचे र्शी रामा बांदेकर यांना सांगितले. हट्समध्ये दोघे पर्यटक आग लागताक्षणी बाहेर धावले. त्यांचे सामान मात्र भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. त्या हट्सच्या नजीकच वीजवाहिन्या होत्या व त्यावर कावळे पक्षी बसले होते. पक्षी उडून जाताक्षणी वीज तारांचे घर्षण होऊन किटाळे उसळली व हट्स पेट घेतल्याचे काही नागरिकांनी सांगितले. एक हट्स संपूर्ण उभा करण्यासाठी दीड लाख रुपये खर्च केल्याचे सांगताना त्यातील फर्नीचर धरून अंदाजे 15 लाक रुपयांचे नुकसान झाल्याचे बांदेकर यांनी सांगितले. त्यावेळेस वारा नव्हता. त्यामुळे नजीकच्या घरांना झळ पोचली नाही. परंतू बांदेकर यांच्या हट्सला खेटून असलेल्या र्शी नाईक यांचे हट्स व शंकर यांच्या घराचा किंचित भाग जळून खाक झाला. पेडणे अग्नीशामक दलाचे एन वेर्णेकर, हवालदार पी. धारगळकर व अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक युवक, स्त्री -पुरुषांनी धावाधाव करून जमतील तितकी साधने घेऊन आग विझविण्यास सहकार्य केले. तलाठी संतोष गडेकर, पोलीस संतोष परब यांनी पंचनामा केला. ---- यांच्या चरितार्थाचे साधन हिरावले गेल्याने कुटुंबियांवर आघात कोसळला असून बांदेकर हे हताश व मुच्र्छा येऊन कोसळल्याचे समजते. सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी आशा कुटुंबीय बाळगून आहे. फोटो : आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले हट्स