पान ५ : फोमेन्तोच्या कामगारांवर बेकारीची टांगती तलवार
By admin | Published: July 22, 2015 12:34 AM
फोंडा : फोमेन्तो खाण कंपनीने सोमवारी अचानक आपल्या कुड्डेगाळ येथील खाणीवरील सुमारे २१९ कामगारांना कामावरून कमी केल्याने त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांमागे ऐन चतुर्थीच्या काळातच खाण व्यवसायावर बंदी आली होती. आताही पुन्हा चतुर्थी जवळ आली असता कंपनीने अचानक कामगारांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार धास्तावले आहेत.
फोंडा : फोमेन्तो खाण कंपनीने सोमवारी अचानक आपल्या कुड्डेगाळ येथील खाणीवरील सुमारे २१९ कामगारांना कामावरून कमी केल्याने त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांमागे ऐन चतुर्थीच्या काळातच खाण व्यवसायावर बंदी आली होती. आताही पुन्हा चतुर्थी जवळ आली असता कंपनीने अचानक कामगारांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार धास्तावले आहेत. राज्यातील खाणबंदी उठण्याची स्पष्ट अशी शक्यता दिसत नसल्याने राज्यातील अनेक खाण कंपन्यांनी कामगार कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे. काही खाण कंपन्यांनी कामगारांपुढे स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा पर्याय ठेवला आहे. मात्र, फोमेन्तो खाण कंपनीने तसा कोणताही प्रस्ताव न ठेवता २१९ कामगारांना तडकाफडकी कारावरून काढले जात असल्याची नोटीस खाणीच्या गेटवर लावल्याने कामगारांनी कंपनीच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. प्राप्त माहितीनुसार, खाणी सुरू असताना कुड्डेगाळ खाणीतून कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन करण्यात आले होते. त्यामुळे खाण व्यवसाय पूर्ववत सुरू झाला तरी खाणींना लागू केलेल्या नवीन निर्बंधामुळे कुड्डेगाळ खाणीतून आणखी उत्खनन करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याने कंपनीने कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)कामगारांना वार्यावर सोडणे पूर्णपणे चुकीचे : मंगेशकरयासंदर्भात कामगार नेते राजू मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून फोमेन्तो कंपनी पूर्वीपासूनच असे कामगारविरोधी निर्णय घेत आल्याचे सांगितले. या खाणीवरील कामगारांची संघटना कणखर नाही. त्यामुळेच अशा कंपन्यांचे आयते फावत असल्याचे ते म्हणाले. अन्य कंपन्याही कामगार कपात करीत आहेत. मात्र, त्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देत असल्याचे ते म्हणाले. फोमेन्तो खाण कंपनीने खाण व्यवसाय सुरू असताना मोठ्या प्रमाणात कमावले आहे. त्यामुळे त्यांनी कामगार कपातीचा निर्णय घेताना कामगारांना अशा प्रकारे वार्यावर सोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणीही खाण कंपनी अशा प्रकारे कामगारांची सतावणूक करीत असल्यास त्याचा सर्व स्तरांतून निषेध होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कामगारांंची बैठक दरम्यान, कुड्डेगाळ खाणीवरील कामगारांनी कंपनीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी खाणीच्या गेटसमोर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.