पान ७ - शेतकर्यांनी शासकीय योजनांचा फायदा घ्यावा
By admin | Published: July 22, 2015 12:34 AM
रमेश तवडकर : पेडणे तालुका शेतकरी सोसायटीत पशुसंवर्धन मेळावा
रमेश तवडकर : पेडणे तालुका शेतकरी सोसायटीत पशुसंवर्धन मेळावाकोरगाव : गोवा सरकारने शेतीसंदर्भात आणि पशू उत्पादनसंदर्भात अनेक योजना आखल्या आहेत. तरीही गोव्यातील युवक या व्यवसायाक डे वळत नाहीत. गेली कित्येक वर्षे आपण शेती व्यवसाय करीत आहोत. त्यामुळे आजचा तरुण वर्ग या व्यवसायाकडे वळत नसल्याची कारणे पुढे आली आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी पारंपरिक पद्धती सोडून मातीत व शेणात हात न घालता आधुनिक पद्धतीने या व्यवसायाकडे युवकांनी पाहावे. यातून युवक दरमहा एक लाख रुपये किंवा त्याहीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकतो. यासाठी सरकारने शेतकी आणि पशुसंवर्धन खात्याच्या अगोदरच्या योजनांमध्ये बदल केला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी पेडणे येथे दिली. पेडणे तालुका शेतकरी सोसायटी सभागृहात आयोजित पशुसंवर्धन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सभापती राजेंद्र आर्लेकर, पेडणे नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद केरकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई व डॉ. विलास नाईक उपस्थित होते. या वेळी वासुदेव देशप्रभू व मिलिंद केरकर यांनी विचार व्यक्त केले.पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई यांनी मार्गदर्शन केले. सभागृहात पशुसंवर्धनासंदर्भातील अत्याधुनिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत होती. पेडणे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विलास नाईक यांनी तर आभार डॉ. गावठणकर यांनी मानले. (वार्ताहर)फोटो : पेडणे येथे मेळाव्यात बोलताना पशुसंवर्धन खात्याचे मंत्री रमेश तवडकर. बाजूस सभापती राजेंद्र आर्लेकर, मिल्िंाद केरकर, डॉ. संतोष देसाई, डॉ. विलास नाईक. (विनोद मेथर) २०१५०७२१, १२२३२७ फोटो मेल केले आहेत.