Pahalgam Attack Video: पहलगामच्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी पर्यटकांना निवडून निवडून मारलं. दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यदर्शींकडून या घटनेचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी कशाप्रकारे पर्यटकांना लक्ष्य केले, याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. दहशतवादी पर्यटकांवर गोळ्या झाडताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या काश्मीर खोऱ्यातील बैसरन घाटीत देशातील वेगवेगळ्यातील भागातून गेलेल्या नागरिकांचं रक्त सांडलं. पर्यटकांच्या आक्रोशाने बैसरन घाटी हादरली.
द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी बैसरन घाटीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर निवडून निवडून गोळ्या झाडल्या. यात तब्बल २६ नागरिक मारले गेले. यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा समावेश आहे.
हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून कळलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी लोकांना वेगवेगळं केलं. धर्म विचारून दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनावरच गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी कशा पद्धतीने पर्यटकांची हत्या केली याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
दहशतवादी पर्यटकांवर गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ
दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी काही पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावले. लांब जाऊन काहींनी ही घटना बघितली. एका पर्यटकांने व्हिडीओ शूट केला आहे. ज्यात खाली काही पर्यटक बसलेले आहेत आणि दहशतवादी त्यांच्यावर गोळ्या झाडत आहे.