शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 21:12 IST

Pahalgam Terrot Attack : सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात कारवाई सुरू केली आहे.

Pahalgam Terrot Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कारवाई सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात 1500 हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि संवेदनशील भागातून पकडण्यात आले आहे. 

यामध्ये ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW), माजी दहशतवादी आणि ज्यांच्याविरुद्ध आधीच एफआयआर दाखल झाले आहेत किंवा ज्यांची नावे गुप्तचर यंत्रणेच्या वॉच लिस्टमध्ये आहेत, अशा सर्वांचा समावेश आहे. हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्यांचा शोधही तपास यंत्रणा घेत आहेत. संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

या कारवाईद्वारे हल्ल्यामागील नेटवर्क आणि स्लीपर सेल्सचा शोध घेतला जातोय. हल्लेखोरांना कोणी आश्रय दिला, मदत केली किंवा शस्त्रे पुरवली हे शोधण्यासाठी सध्या या सर्व लोकांची कठोर चौकशी केली जात आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली जात आहेत. संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केली जात आहे. 

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की दहशतवादाविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, केंद्र सरकार नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वचनबद्ध आहे आणि दहशतवादाचे जाळे उखडून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी घेतलीटीआरएफच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण आणि निधी मिळत असल्याचा आरोप सतत केला जात आहे. टीआरएफने खोऱ्यात रक्तपात घडवून आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या संघटनेने अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत. टीआरएफ हा लष्कर-ए-तैयबाचा एक नवीन चेहरा मानला जातो, ज्याला आंतरराष्ट्रीय दबावापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने 'स्थानिक काश्मिरी चळवळ' म्हणून चित्रित केले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्ला